गुरुवार, २१ जुलै, २०१६

पावसाच्या कविता


पावसाच्या कविता
• रघुनाथ सोनटक्के


पाऊस आला की
तु खुप भिजायचीस
माझ्या उबदार कुशीत 
गुपचुप निजायचीस

तुला आठवत असेल
आपलं पावसात भिजनं
बिलगन्या मिठीमधे
तुझं खोटंखोटं लाजनं

देई तुला शिरशिरी
तो बिलगणारा वारा
ओढण्या जवळ माझ्या
बरसती त्या धारा

म्हटलो होतो तुला सखे 
तु दूर नको जाऊस
आळवीत होता तुला
तो बरसणारा पाऊस

तुझ्या माझ्या मिलनाला
साक्षी आहे पाऊस
धुंद या ऋतुत मला सखे
सोडून नको जाऊस
    
तु होतीस अन् मी होतो
त्या शेताच्या बांधावर
धाय मोकलून रडली होतीस
पावसात माझ्या खांद्यावर

साक्षी आहे आपल्या प्रेमाला 
ते बांधावरलं हिरवं झाड
श्रावणातल्या सरीसवे सखे
ती आठवण तरी काढ

तु येशील भिजायला म्हणुन
रोज पाऊस बरसतो
पाहण्या माझ्या मिठीमधे तुला
ढगाढगातुन गरजतो
•••
- रघुनाथ सोनटक्के
880 579 1905

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा