मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

माझं मन


« माझं मन »

तुझ्याशिवाय एकटं एकटं
झालंय माझं मन
तुझ्या प्रेमाला आसुसलं
सखे गं माझं मन

• रघुनाथ सोनटक्के

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

प्राणही लावेन पणाला


« माझं मन »

तुझ्यावर किती प्रेम सखे
विचार माझ्या मनाला
चंद्रतारे तर नाही देवु शकेन
प्राणही लावेन पणाला
• रघुनाथ सोनटक्के

रविवार, १० डिसेंबर, २०१७

खूपदा सांभाळलं

« मुक्तक »
खूपदा सांभाळलं मी त्यांच्या जखमांना 
पण शेवटी मीठ चोळून गेलेच साले!
● रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

प्रेमाचा माठ

  मि तुला भेटायला येतो
    नदीच्या त्या तटावर
भरू दे मला प्रेमाचा माठ
  तुझ्या लाल ओठावर
• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

फुलं फुलतात

« प्रेमचारोळी »


फुलं फुलतात नेहमीसारखी 
मोगराही फुलत असतो 
तुझ्याशिवाय आलोय म्हणून 
मला बोलत असतो 
    • रघुनाथ सोनटक्के
      8805791905

      हृदयस्पर्शी प्रेमकविता वाचण्यासाठी माझ्या या ब्लॉगला सबस्क्राइब करा. 
https://kavitamanamanatalya.blogspot.in

गुरुवार, ३० मार्च, २०१७

जादू भारी

तुझ्या मनात जे आहे 
तेच माझ्या मनात आहे 
डोळ्यांचं कळतं मनाला
हि जादू भारी प्रेमात आहे

• रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २९ मार्च, २०१७

रूपाचा मोह

रूप तुझं न्याहाळण्याचा
मला आवरेना मोह
डुंबून जातो तुझ्या डोळ्यात
खोल खोल तो डोह

• रघुनाथ सोनटक्के

रेशम

रूप तुझं मोहक
स्पर्श किती  रेशम
आतुरला जीव भेटाया
मनाला घालु कसा वेसण

• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, २१ मार्च, २०१७

देखणं रूप



साठवुन ठेवावसं वाटते 
तुझं देखणं रूप
कसं सांगू तुला सखे 
तू आवडतेस खूप 
• रघुनाथ सोनटक्के

Tejaswing Lonari

सोमवार, २० मार्च, २०१७

रेशमाचा दुवा

« प्रेमचारोळी »
तु रागावलीस माझ्यावर जरी
तुझ्या-माझ्यात रेशमाचा दुवा आहे
तुझ्या आठवणीत किती जगावं
तुझा सहवासही मला हवाहवा आहे
    • रघुनाथ सोनटक्के
  8805791905
      यासारख्या असंख्य प्रेमचारोळ्या वाचा येथे 

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

मी आणि तु

मी मंदिराची पायरी
तु देवाचा कळस
तु अंगणातली तुलसी
मी रानातला पळस
• रघुनाथ सोनटक्के 



बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

माझं हळवं प्रेम


माझं हळवं प्रेम सखे
कळलंच नाही तुला
काहीच कसं उत्तर नव्हतं
माझ्या प्रेमपत्राला
• रघुनाथ सोनटक्के

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

जळताना

« प्रेमचारोळी »
• • •
  मि केलेलं प्रेम तुझ्यावर
    कसं गेलं सारं वाहून
  काही वाटलं नाही तुला
   जळताना मला पाहून
   • रघुनाथ सोनटक्के

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

रेशमाचा दुवा

« प्रेमचारोळी »

तु रागावलीस माझ्यावर जरी 
तुझ्यामाझ्यात रेशमाचा दुवा आहे
तुझ्या आठवणीत किती जगावं
तुझा सहवास मला हवाहवा आहे
    • रघुनाथ सोनटक्के
      8805791905
      हृदयस्पर्शी प्रेमकविता वाचण्यासाठी माझ्या या ब्लॉगला सबस्क्राइब करा. 
https://kavitamanamanatalya.blogspot.in

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

त्या गोड भेटी

« प्रेमचारोळी »
• • •

तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि
शब्द अलगद येतात ओठी
विरहाच्या लांबलचक वेलीवर
आठवतात त्या गोड भेटी
    • रघुनाथ सोनटक्के
      8805791905
      हृदयस्पर्शी प्रेमकविता वाचण्यासाठी माझ्या या ब्लॉगला सबस्क्राइब करा. 
https://kavitamanamanatalya.blogspot.in

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

तुझ्यासाठीच तर

•••
तु नेहमी म्हणायचीस 
माझ्यावर कविता कर 
तुझ्यासाठीच तर सखे मी
लिहतोय आयुष्यभर 
•••
♥ रघुनाथ सोनटक्के