बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

मी आणि तू


मी तप्त लाव्हा
तू गार वारा 
मी भ्रमणारा ग्रह 
तू  तेजस्वी तारा
 रघुनाथ सोनटक्के



सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

आपल्या कहाणीत

•••
शब्दच नव्हते आपल्या कहाणीत
नुसता डोळ्यांचाच होता बोलबाला
भेटीगाठी, आणाभाका अन् मिलन कसलं
विरहच तर जाळत होता हृदयाला
- रघुनाथ सोनटक्के©
#कविता मनामनातल्या

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

गोड हसणं

••• 
तिचं हसणंच आहे
माझ्यासाठी अनमोल ठेवा
नको हिरावूस कधीही 
तिचं गोड हसणं देवा
• रघुनाथ सोनटक्के©


शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

प्रेमाचे गोड बंध

• • •
अतुट आहेत आपले सखे
प्रेमाचे गोड बंध
फुलापासुन कसा होईल
वेगळा त्याचा गंध
• रघुनाथ सोनटक्के©

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तु पावसाची सर




श्रावणातल्या पावसासारखी तु
कधी रिमझिम तर कधी सर
तु दिलेला तो प्रेमाचा गारवा
जपुन ठेवलाय मि आयुष्यभर
• रघुनाथ सोनटक्के©

गुरुवार, २१ जुलै, २०१६

पावसाच्या कविता


पावसाच्या कविता
• रघुनाथ सोनटक्के


पाऊस आला की
तु खुप भिजायचीस
माझ्या उबदार कुशीत 
गुपचुप निजायचीस

तुला आठवत असेल
आपलं पावसात भिजनं
बिलगन्या मिठीमधे
तुझं खोटंखोटं लाजनं

देई तुला शिरशिरी
तो बिलगणारा वारा
ओढण्या जवळ माझ्या
बरसती त्या धारा

म्हटलो होतो तुला सखे 
तु दूर नको जाऊस
आळवीत होता तुला
तो बरसणारा पाऊस

तुझ्या माझ्या मिलनाला
साक्षी आहे पाऊस
धुंद या ऋतुत मला सखे
सोडून नको जाऊस
    
तु होतीस अन् मी होतो
त्या शेताच्या बांधावर
धाय मोकलून रडली होतीस
पावसात माझ्या खांद्यावर

साक्षी आहे आपल्या प्रेमाला 
ते बांधावरलं हिरवं झाड
श्रावणातल्या सरीसवे सखे
ती आठवण तरी काढ

तु येशील भिजायला म्हणुन
रोज पाऊस बरसतो
पाहण्या माझ्या मिठीमधे तुला
ढगाढगातुन गरजतो
•••
- रघुनाथ सोनटक्के
880 579 1905

मंगळवार, १२ जुलै, २०१६

साक्षी आहे पाऊस


 • • 

तुझ्या माझ्या मिलनाला
साक्षी आहे पाऊस
धुंद या ऋतुत मला सखे
सोडून नको जाऊस
रघुनाथ सोनटक्के

आळवीत होता


 • • 

म्हटलो होतो तुला सखे 

तु दूर नको जाऊस

आळवीत होता तुला

तो बरसणारा पाऊस

रघुनाथ सोनटक्के

बुधवार, ६ जुलै, २०१६

पावसात भिजनं

तुला आठवत असेल
आपलं पावसात भिजनं
बिलगण्या मिठीमधे
तुझं खोटंखोटं लाजनं
• रघुनाथ सोनटक्के


तु येशील भिजायला

तु येशील भिजायला म्हणुन
रोज पाऊस बरसतो
पाहण्या मिठीमधे तुला
ढगाढगातुन गरजतो
• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, ५ जुलै, २०१६

बांधावरलं हिरवं झाड

साक्षी आहे आपल्या प्रेमाला
ते बांधावरलं हिरवं झाड
 श्रावणातल्या सरीसवे सखे
ती आठवण आतातरी काढ
• रघुनाथ सोनटक्के


शुक्रवार, २४ जून, २०१६

पाऊस आला की

पाऊस आला की
तु खुप भिजायचीस
माझ्या उबदार कुशीत
गुपचुप निजायचीस
- रघुनाथ सोनटक्के


गुरुवार, २३ जून, २०१६

त्या पावसात

तु होतीस अन् मी होतो
त्या आपल्या शेताच्या बांधावर
धाय मोकलून रडली होतीस
त्या पावसात माझ्या खांद्यावर
• रघुनाथ सोनटक्के



खोटंखोटं का होईना

खोटंखोटं का होईना हळूच 
एकदा माझ्याकडे बघ
भरलयं किती माझ्या डोळ्यात प्रेम
कळेल तुला मग
 - रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २२ जून, २०१६

वाटलंच कसं नटावं

माझ्या प्रेमाला नाकारून 
तुला वाटलंच कसं नटावं 
कधी वाटलं नाही तुला 
माझ्या आसवांनाही भेटावं 
                                       - रघुनाथ सोनटक्के


गुरुवार, १९ मे, २०१६

आठवांच्या सरी

येतेय का तुला प्रिये 
माझी आठवण  तरी
 मी तर झालो गलितगात्र  
झेलून आठवांच्या सरी
- रघुनाथ सोनटक्के

बुधवार, ४ मे, २०१६

सैराट

तुला बघितलं की आर्चे
मन माझं सैराट पळतं
छातीत धडधडलं तरी
पाऊल तुझ्याकडं वळतं 
 ♥ रघुनाथ सोनटक्के


सोमवार, २ मे, २०१६

कधीतरी

  •••    
येत असेल आठवण तर 
काढ कधीतरी 
दडलेलं स्वप्नं चांदण्यांना 
सांग कधीतरी 
 ♥ रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

भेटशील कधीतरी


●●●
फक्त एक स्वप्न
बांधलय मी उरी
आज नाही तर उद्या
भेटशील कधीतरी
 रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

प्रेमाचं तळं

●●●
अजुनही हृद्यात साठलंय
तुझ्या प्रेमाचं तळं
आठवणींसवे चाखतोय तुझ्या
प्रेमाचं पाणी गोडं
❤ रघुनाथ सोनटक्के
●●●

मंगळवार, २९ मार्च, २०१६

कसा विसरू

●●● आपल्या पहिल्या भेटीची आहे मला क्षण न् क्षण याद कसा विसरू शकेन मी तुझ्या ओठांचा स्वाद ●●● • रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २३ मार्च, २०१६

खुलु दे

●●●
सप्तरंगात तुझ्याशी सखे
खेळू दे होळी
जाळून टाक गैरसमज

खुलु दे कळी

रघुनाथ सोनटक्के




शुक्रवार, ११ मार्च, २०१६

निरागस, बोलके डोळे


मला आठवतात अजुनही
तुझे निरागस, बोलके डोळे
बरे झाले कळले असते तेव्हा
छुपे भाव थोडे

रघुनाथ सोनटक्के




शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

तुझ्या ओंठावर

●●●

मोगरा, गुलाब यांना काय
फक्त गोड सुगंध आहे 
माझ्या मनपाखरास माहीत

 तुझ्या ओंठावर किती मकरंद आहे
                                रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

तुझ्याशिवाय


उरतंच काय माझ्या आयुष्यात
जर तु माझ्यातून वजा आहे
तुझ्याशिवाय मी गंधाहिन फुल
मग जगण्यातच काय मजा आहे



शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

चिरून बघ



मी तुझ्यावर किती प्रेम करतो 
देवू तुला कशाची ग्वाही 
पाहून घे डोळ्यात माझ्या 
चिरून बघ काळजालाही 
● रघुनाथ सोनटक्के

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

झाकून बघ डोळ्यात


मी खुप प्रेम करतो सखे 

अन् म्हणतेस त्यात काय वेगळं?

झाकून बघ माझ्या डोळ्यात 

सामावलं आहे त्यात सगळं 

- रघुनाथ सोनटक्के



शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

अोठांची तलवार



तुझ्या ओठांची तलवार 

अन् डोळ्यांचा डोह

आवरेना मजला प्रिये 

त्यांत डुंबण्याचा मोह
                      
©

 रघुनाथ सोनटक्के



गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

भावनांचा कापून गळा



माझ्या भावनांचा कापून गळा 

तुला आला नाही थोडाही कळवळा  
                                   - रघुनाथ सोनटक्के 
Raghunath Sontakke
रघुनाथ