गुरुवार, १९ मे, २०१६

आठवांच्या सरी

येतेय का तुला प्रिये 
माझी आठवण  तरी
 मी तर झालो गलितगात्र  
झेलून आठवांच्या सरी
- रघुनाथ सोनटक्के

बुधवार, ४ मे, २०१६

सैराट

तुला बघितलं की आर्चे
मन माझं सैराट पळतं
छातीत धडधडलं तरी
पाऊल तुझ्याकडं वळतं 
 ♥ रघुनाथ सोनटक्के


सोमवार, २ मे, २०१६

कधीतरी

  •••    
येत असेल आठवण तर 
काढ कधीतरी 
दडलेलं स्वप्नं चांदण्यांना 
सांग कधीतरी 
 ♥ रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

भेटशील कधीतरी


●●●
फक्त एक स्वप्न
बांधलय मी उरी
आज नाही तर उद्या
भेटशील कधीतरी
 रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

प्रेमाचं तळं

●●●
अजुनही हृद्यात साठलंय
तुझ्या प्रेमाचं तळं
आठवणींसवे चाखतोय तुझ्या
प्रेमाचं पाणी गोडं
❤ रघुनाथ सोनटक्के
●●●

मंगळवार, २९ मार्च, २०१६

कसा विसरू

●●● आपल्या पहिल्या भेटीची आहे मला क्षण न् क्षण याद कसा विसरू शकेन मी तुझ्या ओठांचा स्वाद ●●● • रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २३ मार्च, २०१६

खुलु दे

●●●
सप्तरंगात तुझ्याशी सखे
खेळू दे होळी
जाळून टाक गैरसमज

खुलु दे कळी

रघुनाथ सोनटक्के




शुक्रवार, ११ मार्च, २०१६

निरागस, बोलके डोळे


मला आठवतात अजुनही
तुझे निरागस, बोलके डोळे
बरे झाले कळले असते तेव्हा
छुपे भाव थोडे

रघुनाथ सोनटक्के




शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

तुझ्या ओंठावर

●●●

मोगरा, गुलाब यांना काय
फक्त गोड सुगंध आहे 
माझ्या मनपाखरास माहीत

 तुझ्या ओंठावर किती मकरंद आहे
                                रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

तुझ्याशिवाय


उरतंच काय माझ्या आयुष्यात
जर तु माझ्यातून वजा आहे
तुझ्याशिवाय मी गंधाहिन फुल
मग जगण्यातच काय मजा आहे



शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

चिरून बघ



मी तुझ्यावर किती प्रेम करतो 
देवू तुला कशाची ग्वाही 
पाहून घे डोळ्यात माझ्या 
चिरून बघ काळजालाही 
● रघुनाथ सोनटक्के

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

झाकून बघ डोळ्यात


मी खुप प्रेम करतो सखे 

अन् म्हणतेस त्यात काय वेगळं?

झाकून बघ माझ्या डोळ्यात 

सामावलं आहे त्यात सगळं 

- रघुनाथ सोनटक्के



शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

अोठांची तलवार



तुझ्या ओठांची तलवार 

अन् डोळ्यांचा डोह

आवरेना मजला प्रिये 

त्यांत डुंबण्याचा मोह
                      
©

 रघुनाथ सोनटक्के



गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

भावनांचा कापून गळा



माझ्या भावनांचा कापून गळा 

तुला आला नाही थोडाही कळवळा  
                                   - रघुनाथ सोनटक्के 
Raghunath Sontakke
रघुनाथ

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

मशाल आहे मी

एकटा एकटा खुशाल आहे मी 
धगधगणारी आतुन मशाल आहे मी 
                                   - रघुनाथ सोनटक्के 



सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

तिने मला मागितले

तिने मला मागितले 
चंद्र आणि तारे 
मी म्हटलं तुझ्याचसाठी तर खोचले 
आकाशात सारे 
                     - रघुनाथ सोनटक्के 


सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

तुझ्याविणा रीता

मी तुझा सागर
तु माझी सरीता
विशाल असलो तरी 
तुझ्याविणा रीता
          -  रघुनाथ सोनटक्के 



बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

माझ्यावरचं प्रेम

तुझं वळून पाहणं 
हे माझ्यावरचं प्रेम आहे 
माझं बघतच राहणं 
हे तुझ्यावरचं प्रेम आहे 
            - रघुनाथ सोनटक्के 


मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

जन्म पुन्हा पुन्हा

भलेही करू नकोस प्रेम 
करेल मीच हा गुन्हा 
तुझ्यासाठी घेत राहीन 
जन्म पुन्हा पुन्हा 
            - रघुनाथ सोनटक्के 


Kavita Manamanatalya

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

भेटशील कधीतरी

भेटशील कधीतरी तु मला 
आयुष्याच्या वळणावर 
विश्वास आहे मला 
माझ्या निरागस प्रेमावर 



गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

आयुष्याच्या पाकळ्यांना

आयुष्याच्या पाकळ्यांना सुटलाय 
तुझ्या प्रेमाचा गंध 
काट्यांचीही दाहकता सोसेल मी 
सखे तुझ्या संग 
                                          - रघुनाथ सोनटक्के  



मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

प्रेमात पडणं


तुही नवी मीही नवा प्रेमात पडणं 
क्षितिजावरती पृथ्वीशी आकाशानं भिडणं 
                                                           - रघुनाथ सोनटक्के

Kavita Manamanatalya

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

प्रेमाच्या शाईने


डोकाऊन बघ जरासे मनात 
छेडून बघ मनाच्या तारा 
लिहून काढ प्रेमाच्या शाईने 
माझ्या मनाचा कागद कोरा 
                                    - रघुनाथ सोनटक्के 

Love

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

झाकून माझ्या अंदर


तु आहेस सखे
किती  सुरेख अन सुंदर
बघून घेना जरा
झाकून माझ्या अंदर
           - रघुनाथ सोनटक्के

Love

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

कशा हवे


चंद्र आणि तारे नभीचे 
सखे तुला कशा हवे ?
हिऱ्यासारखं मन दिलं माझं 
आणखी काय हवे ?
  - रघुनाथ सोनटक्के 


Love